नमस्कार सर,
हे मी करमत नाही म्हणून लिहित नाही, तर खरोखर काही मार्गदर्शन आपण करावे म्हणून लिहित आहे कारण online कौन्सिलिंग ची फी तर आपणास माहीतच आहे! तुम्हाला ती द्यावी लागणार आणि तुम्ही मागितली तरी द्यायला (अगदी सेकंदाच्या हिशेबाने) आपण तयार आहोत! कारण हल्ली मी रुना बर्न बाईंचे 'द सिक्रेट' वाचले आणि त्याबरहुकुम वागण्याचा प्रयत्न केला, म्हणजे मी स्वतःला अब्जोपती आहे असे समजू लागलो आणि शब्दश: तसा वागू लागलो, पण आय किंवा उत्पन्न मात्र काही नाही मात्र तसा खर्च मात्र लोक सांगू लागले आहेत, त्याविषयी काय करावे? म्हणजे सविस्तर सांगायचे तर आता सोबर असताना नको ते लोक आपल्या जवळ येतात किंवा जवळीक साधण्याचा प्रयत्न करतात, आपल्या भिडस्त स्वभावामुळे आपण त्यांना कांही बोलत नाही हि बाब अलहिदा. मात्र अशा लोकांच्यात राहिल्याने त्यांचे ऐकून घ्यावे लागते आणि कधी 'तसे' म्हणजे त्यांनी सुचवलेले करून पाहावे लागते आहे. त्यानुसार अशा लोकांना माझे दात (नसलेले) खटकतात! जे मला आजतागायत दहा वर्ष खटकले नाहीत! त्यांच्या म्हणण्यानुसार मी मनावर घेऊन आणि सिक्रेट वाचून डॉ. नंदा यांच्या क्लिनिक मध्ये गेलो...तर त्यांनी खर्च फक्त सत्याऐंशी हजार इतका क्षुल्लक सांगितला.आता सिक्रेट च्या हिशेबाने हा चील्लरच खर्च नाही का? असो.
आणि आता थोडे नाटक सिनेमा यात रमत असल्याने सद्यस्थितीत जर मला कोणी विचारले की, सुखी माणसाचा सदरा कोठे आहे? तर मी माझा सदरा देण्यास तयार असतो...इतकी बेफिकिरी सध्या आहे...पण माझा प्रॉब्लेम काय आहे हे कदाचित अजून मला नीट कळत नसावे.
कारण जेंव्हा इथे येतो, तेंव्हा मिटिंग मधल्या विषयाशी आपण (मी ) स्वतःला ताडून बघतो तेंव्हा कळते (तेदेखील मिटिंग नंतर...) त्याचे असे झाले की, मी शनिवारी मिटिंग नंतर घरी आलो तेंव्हा आईने सांगितले, की 'बघ, आज जेवण तयार आहे.'
हे लिहिण्याचे कारण की, मागच्या महिन्यात शनिवारी मिटींगला येत असताना आईने विचारले होते की घरी किती वाजता येणार? मी काही सांगितले नाही कारण एखाद्या वेळी मी परस्पर सिनेमाला वगैरे जात असतो त्यामुळे.
त्यानंतर मी मिटिंग संपल्यावर लगेच घरी आलो, तर जेवण तयार नव्हते त्यावर मी भयंकर रागावलो आणि फाडकन आईला बोललो की आज जेवण करणा-या बाईला का जेवण न बनवता जाऊ दिले?
वास्तविक मी इतके चीडण्याचे कारण नव्हते. एखाद्या तासाने काही फरक पडणार नव्हता, मात्र मी जे काही थोडे वेडेवाकडे बोललो, ते बोलत असताना मला भलेही नंतर असे बोललो त्याचा पश्चाताप झाला, तरी त्यावेळी तरी बरेच वाटत होते. याचा अर्थ सारंग सरांनी सांगितले तसे मी अजून जुनी खुन्नस resentment काढली नसेल,किंवा मागचे कांही अजून तसेच असेल. मात्र मी त्याचा अर्थ असा काढला की राग मागचा अजून कदाचित आहे.
थोडे विस्ताराने सांगायचे तर आईला आता काम होत नाही म्हणून घरी स्वयंपाकाला बाई आहे, कारण घरी बहिण व भाऊ दोघांनाही कामाला जायचे असल्याने त्यांना वेळेत डबा हवा.
आता मी मला काय समजते ते सांगतो...
मला कळते की, आठवडाभर बाईच्या हाताचे खायचा कंटाळा आला असेल म्हणून बाईला सुटी देऊन आई स्वतः काहीतरी नवीन पदार्थ करेल हे समजते, तसेच मी बाहेर कधी काही खाऊन येईन अथवा घरीदेखील कधी उशिरा जेवतो हे माहित असल्याने तिला मला काही सांगावेसे वाटत नसेल...पण कळत असून देखील कदाचित मला मागे मला हवे त्या वेळी पैसा, जमीन दिली नाही, आता कदाचित मी त्यावेळी काहीतरी केले असते याचे वाईट वाटते...असे कळते मात्र त्यानंतर मी क्षुल्लक बाब म्हणून याकडे पहिले.
मात्र आज पुन्हा असेच काही झल्यावर प्रकर्षाने आठवण झाली. असो.
येत गेल्याने कमीत कमी अजून भरपूर सुधारणा बाकी आहेत हे लक्षात येते आणि आता थंडी मस्त पडल्याने तोंडावर पांघरून घेऊन उशिरापर्यंत झोपण्यात जी मजा आहे ती सकाळी इनपुटला येण्यापेक्षा जास्त वाटत आहे....! तरी येण्याचा प्रयत्न नक्की करीन.
सध्या तरी आपण सेकंदाला कौन्सिलिंगचे पैसे देण्यास तयार आहोत (सिक्रेट नुसार देऊ नका...तर दिल्यासारखे वागा!) असो.
कळावे