ख-या अर्थाने 'कृपा' मधील सहजीवन किंवा तेथील विश्व हा अत्यंत मर्यादित असा भाग आहे. इथे मी माझ्या मर्जीने राहत असो अथवा नाईलाजाने राहत असो, मला येथील दिनक्रमापासून ते जेवण इत्यादिपर्यंत सर्व बाबतीत तडजोड स्वीकारावी लागते. हा दिनक्रम मला कांही दिवसात अंगवळणी देखील पडतो. याचा अर्थ तो मी स्वेच्छेने स्वीकारला आहे असा अजिबात नाही. कारण जर तसे असते तर डिस्चार्ज झाल्यानंतर घरीदेखील मी तो आचरणात आणायला हवा. पण तसे होत नाही. याचाच अर्थ मी एका मर्यादित काळापर्यंत येथे राहणार असून तो दिनक्रम मी त्या कालावधीत पाळेन, हे स्वतःला घातलेले एक बंधन आहे का? तर नाही, तो स्वतःशी केलेला एक समझोता आहे असे मी म्हणेन.
आता त्याचे विश्लेषण आणि निगोसिएशन या सर्व बाबी आणि सेल्फ एस्टीम या शब्दांच्या जंजाळात मी स्वतःला बसवून विश्लेषण करू इच्छित नाही आणि माझे ते काम देखील नाही! मात्र स्वानुभव आणि एखाद्या प्रसंगावरून माझे तेथे वर्तन कसे होते आणि घरी त्याच प्रकारचे एखाद्या समस्येत मी कसे वर्तन करतो याविषयी आपण मला मार्गदर्शन करा. कारण मी 'कृपा' मध्ये कोणत्याही प्रसंगात असे म्हणू शकतो की, मला कांही इथे संपूर्ण आयुष्य काढायचे नाही....तसे घरी देखील म्हणू शकेन मात्र इथे तसे का होत नाही?

प्रथम मी 'कृपा' मधील एक प्रसंग सांगतो.....
मी येथे येवून साधारण तीन महिने लोटले होते. येथे मी ब-यापैकी रुळलो होतो. त्यावेळी आता आज येथे एक आफ्टर केअर पेशंट आहेत ते पेशंट म्हणून आले होते. त्यांच्याविषयी मला बरेच कांही सांगण्यात आले होते. ( जसे की ते फार घमेंडी आहेत..अतिशहाणे आहेत इत्यादी इत्यादी) पण मी तसा ऐकून कोणाविषयी पूर्वग्रहदुषित करून घेत नाही हि एक माझी बाजू आहे. असो. तर त्यांचा आणि माझा कांही असा फारसा कधी संबंध आला नाही.जुजबी बोलण्याव्यतिरिक्त मी त्या गृहस्थांशी कधी जास्त बोललो नाही किंवा तेदेखील. मात्र पंधरा एक दिवसांनंतर ते अंघोळीला आले. माझ्या आधी त्यांचा नंबर होता. त्यांनी गरम पाण्याच्या रांगेत दोन बादल्या लावल्या होत्या. मी त्यांना एक बादली काढून घेण्याविषयी अत्यंत सौम्य, मृदू भाषेत विनंती केली. त्यावर ते गृहस्थ मला म्हणाले, की ते रोज दोन बादल्याच पाणी घेतात. मी त्यांना अजून नम्रपणे सांगितले की, मी देखील इतरांसारखा थंड पाण्याने नाही अंघोळ करु शकत. मला देखील सर्दी होते. त्यावर ते हट्टाला पेटले व मला कोपिंग स्कील आणि आपण येथे काय शिकतो हे सांगू लागले आणि त्याचबरोबर त्यांना दम्याचा त्रास कसा आहे हे मला पटवून देवू लागले. वास्तविक मी त्यांना सांगितले की, तसा त्रास आपणास आहे तर आपण चार वाजता आंघोळ करत जा. इथे एक बादली भरण्यास किमान पाच मिनिटे लागतात. इतर वेळी ठीक आहे मात्र आता इनपूटची वेळ होते. त्यावर ते मला अरेरावीची भाषा करू लागले आणि मी दोनच बादल्या घेणार कारण मी रोज घेतो असे म्हणू लागले. त्यावर मी त्यांना नम्रता वगैरे सोडून माझ्या भाषेत (जी इथे लिहिता येत नाही!) समजावले. त्यावर त्यांनी एक समझोता केला की यापुढे मी (म्हणजे ते) माझी बादली मागे असेल तर मला प्रथम भरून घेऊ देतील आणि त्यानंतर ते घेतील. मला हेच हवे होते!
आता हा वरवर क्षुल्लक वाटणारा मुद्दा असू शकतो मात्र यामागे माझ्यावर अन्याय होतो आहे, सर्व आणि विशेषत: मी एक एक बादली घेत असताना हे गृहस्थ दोन-दोन बादल्या कशा काय घेऊ शकतात?आणि इतर भरपूर अविवेकी तर्क असण्याची शक्यता आहे. तो माझा विषय नाही. तर इथे त्यांनी दोन काय चार बादल्या घ्याव्यात मात्र माझ्यानंतर घ्याव्यात हा समझोता मला माझा अहंकार सुखावणारा वाटत होता. वास्तविक एखाद्या दिवशी दोन मिनिटे उशीर म्हणजे काही आकाश कोसळत नाही हे मला देखील ठावूक होते मात्र त्यांची सरशी होऊ द्यायची नाही हे काहीतरी ठरवलेले असावे!असो.
हेच घरी दोन तीन माणसांत देखील मी पूर्वी मी करू शकत नसे! जसे टीव्ही...कोणी सहज चॅनल बदलले तरी मी रागाने उठून दारू पिण्यास जात असे. आता किमान तसे होत नाही...धन्यवाद कृपा!!!

No comments:
Post a Comment